कोंकण रेल्वे: कोकण रेल्वे मार्गावर नववर्षासाठी सोडण्यात आलेल्या अहमदाबाद थिवीम गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात आलेली हि गाडी आता अजून आठवडाभर चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्र. ०९४१२ अहमदाबाद – थिविम द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी दिनांक ०५ जानेवारी २०२५ (रविवार) आणि ०८ जानेवारी २०२५ (बुधवार) तर गाडी क्र. ०९४११ थिविम – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष ही गाडी दिनांक ०६ जानेवारी २०२५ (सोमवार)आणि ०९ जानेवारी २०२५ (गुरुवार) या दिवशी आपल्या पूर्वनियोजित थांब्यासह आणि वेळापत्रकासह चालविण्यात येणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad