Konkan Railway: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकावर बनविण्यात आलेल्या ‘अत्याधुनिक एक्झिक्युटिव्ह लाउंज’ चे उद्घाटन कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी केले. यावेळी कोंकण रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, कोकण रेल्वेचे विभागीय व्यवथापक शैलेश बापट आणि केआरसीएलचे इतर अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव रेल्वे स्थानकावर अशी सुविधा देणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज सुरु करण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र क्षेत्रातील अशा प्रकारचे हे पहिले लाउंज ठरले आहे. वातानुकूलित आणि विविध सुविधा असलेले हे लाउंज आरामदायक असेल आणि प्रवाशांना खूप सोयीचे पडेल अशा विश्वास यावेळी संतोष कुमार झा यांनी केला.
एक्झिक्युटिव्ह लाउंज मध्ये कोणत्या सुविधा मिळतात?
देशाच्या विमानतळावर असलेल्या आरामदायक एक्झिक्युटिव्ह लाउंजच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायक सोयी सुविधा देण्यासाठी असे लाउंज आता भारतीय रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकावर बनविण्यात येत आहेत. प्रति तासासाठी काही ठराविक रक्कम देऊन लाउंज मध्ये प्रवाशांना थांबता येते. अशा प्रकारच्या लाउंज मध्ये कमी अधिक फरकाने खालील सुविधा मिळतात
१. दोन तासांचा मुक्काम
२. वाय-फाय
३. शीतपेये (चहा, कॉफी, शीतपेये)
४. वर्तमानपत्र आणि मासिके वाचन
५. ट्रेन माहिती प्रदर्शन आणि घोषणा
६. टीव्ही
७. शौचालये आणि मूत्रालये
८. शू शायनर
९. पूर्णपणे एसी बसण्याची जागा
Facebook Comments Box