Konkan Raiwlay: अलीकडेच मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) कोचसह नवीन रेक मिळाल्याबद्दल प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र तो अल्पकालीनच ठरला आहे. कारण या गाडीला जोडण्यात आलेले ५०% कोच जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान निर्माण केलेले आणि वाईट स्थितीत आहेत.
गाडी क्रमांक १२६२०/६१९ मंगळुरू-मुंबई एलटीटी-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस च्या एलएचबी रेक साठी १६३४८/३४७ मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल-मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी Rake Sharing Arrangement (RSA) साठी निवडण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यांसाठी चालविण्यात येणारे एकूण चार रेक जुने आणि वाईट स्थितीत आहेत.

दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाकडे हे २२ कोचेचे चार रेक आहेत. चार रेकसाठी एकूण ८८ कोचपैकी ४४ कोच नवीन म्हणजे २०२४ मध्ये बांधले गेले आहेत तर उर्वरित २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेले होते. यातील एका रेकमध्ये २०२४ मध्ये बांधलेले २१ कोच आहेत, दुसऱ्यामध्ये १२ कोच आहेत, तिसऱ्या मध्ये ९ आणि चौथ्यामध्ये २०२४ मध्ये बांधण्यात आलेले फक्त २ कोच आहेत. बाकी सर्व जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेलेले कोच आहेत. अशी माहिती मिळाली आहे.

दक्षिणेकडील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी १२ मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली आणि ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदारांनी श्री. सोमन्ना यांना मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या सर्व रॅकवर अलीकडेच बांधलेले डब्यांची जोडणी करण्याचे निर्देश संबंधित विभागीय रेल्वेला द्यावेत अशी विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.
Year of manufacture
|
Number of coaches |
2014 | 1 |
2015 | 3 |
2017 | 1 |
2018 | 8 |
2019 | 5 |
2020 | 4 |
2021 | 8 |
2022 | 8 |
2023 | 6 |
2024 | 44 |
Total | 88 |
Facebook Comments Box