आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 13:37:40 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 24:23:52 पर्यंत
- करण-भाव – 13:37:40 पर्यंत, बालव – 24:51:27 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-प्रीति – 07:39:46 पर्यंत, आयुष्मान – 29:23:43 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:01:05
- सूर्यास्त- 19:17:48
- चन्द्र-राशि-कुंभ – 18:36:08 पर्यंत
- चंद्रोदय- 24:40:00
- चंद्रास्त- 12:09:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- द्वेषयुक्त भाषणाचा प्रतिकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
- आंतरराष्ट्रीय सहल दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1776 : महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची प्रसिद्ध लढाई झाली.
- 1815 : वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव.
- 1830 : फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतला.
- 1908 : फिलीपिन्स विद्यापीठाची स्थापना झाली.
- 1930 : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
- 1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
- 1956 : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
- 1981 : प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाच्या आजाराविरूद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित करण्यात आली.
- 1983 : अंतराळवीर सॅली राइड अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला बनली.
- 1987 : एम. एस. स्वामीनाथन यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
- 2009 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर एक विशेष उपग्रह पाठवला.
- 2017 : किदम्बी श्रीकांत भारतीय बॅडमिंटनपटूला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1887 : ‘डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा’ – थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा जन्मदिन.
- 1899 : ‘शंकर त्रिंबक’ तथा ‘दादा धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1985)
- 1911 : ‘कमला सोहोनी’ – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1997)
- 1931 : ‘के. एस. सुदर्शन’ – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 15 सप्टेंबर 2012)
- 1931 : ‘फर्नांडो हेन्रिक कार्डोसो’ – ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
- 1942 : ‘थाबो म्बेकी’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1942 : ‘पॉल मॅकार्टनी’ – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य यांचा जन्म.
- 1987 : ‘मोईन अली’ – इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1858 : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: 19 नोव्हेंबर 1828)
- 1901 : ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर’ – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1843)
- 1902 : ‘सॅम्युअल बटलर’ – इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1835)
- 1936 : ‘मॅक्झिम गॉर्की’ रशियन लेखक यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1868)
- 1958 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1900)
- 1962 : जे. आर. तथा ‘नानासाहेब घारपुरे’ – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य यांचे निधन.
- 1974 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1896)
- 1999 : ‘श्रीपाद रामकृष्ण काळे’ – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार यांचे निधन.
- 2003: ‘जानकीदास’ – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते यांचे निधन.
- 2005 : ‘मुश्ताक अली’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1914)
- 2009 : ‘उस्ताद अली अकबर खाँ’ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्मविभूषण यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1922)
- 2020 : ‘लच्छमानसिंग लेहल’ – परम विशिष्ठ सेवा वीर चक्र, मेजर-जनरल, यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1923)
- 2021 : मिल्खा सिंग – पद्मश्री, द फ्लाइंग शीख, धावपटू, यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box