



मोपा : अहमदाबाद विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेतून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. 172 प्रवाशांना घेऊन गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागलं. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केलं.
गोव्यातील मोपा विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ६ई – ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतलं. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं होतं. विमान कोसळणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अचानक विमानाचा तोल गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे विमान लँड केलं.
या घटनेनंतर इंडिगोचा वैमानिक अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसंच विमानात देखील नेमका काय बिघाड झाला होता का? किंवा झालेला प्रकार का घडला? याचे कारण शोधण्याची मागणी केली आहे. अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विमानांची सुरक्षा आणि देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता गोव्यात घडलेल्या या घटनेमुळे १७२ प्रवासी चांगलेच घाबरले होते.
IndiGo Goa Lucknow Flight Faces Turbulence, Passenger Says ‘Plane Lost Altitude’ pic.twitter.com/WxY6FuJ9L3
— Indian News Network (@INNChannelNews) June 17, 2025