Mumbai Local: मुंबई उपनगरीय लोकलचे टाईमटेबल पाहण्यासाठी एम इंडिकेटर हे लोकप्रिय अँप आहे. या अँप मध्ये ग्रुप चॅटिंगचीही सोय आहे. मात्र या चॅटिंगचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी या ग्रुप चॅटिंगमध्ये एखाद्या ठिकाणी टीसी आहे अशी माहिती देत असतात. त्यामुळे टीसी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी सावध होतात आणि ते टीसीच्या हाती लागत नाहीत.
प्रत्येक स्टेशन्सवर UTS अँपवरून तिकीट काढण्यासाठी क्यु आर कोर्ड असतो. पण काही प्रवासी या क्युआर कोडचा फोटो काढून कुठूनही तिकीट काढतात. यामुळेही विनातिकीट प्रवासी टीसीला पाहून दूरुनच तिकीट काढतात आणि दंड देण्यापासून वाचतात.
मुंबई लोकलमधून लाखो लोक प्रवासी करतात. अनेक प्रवासी विना तिकीट किंवा विना पास प्रवास करतात. लोकलने प्रवास करताना लाखो प्रवासी लोकलची वेळ कळावी म्हणून एम इंडिकेटर हे अँप वापरतात. या अँपमध्ये ग्रुप चॅटिंगची सोय आहे. कुठली गाडी कुठे आहे, गाड्या वेळेवर आहेत का, गाड्या रद्द तर झाल्या नाही ना याचे अपडेट्स प्रवासी एकमेकांना देत असतात. पण अनेक प्रवासी विशिष्ट ठिकाणी टीसी आहे याची माहिती देतात. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सतर्क होतात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होतं. या बाबत ‘एम इंडिकेटर’ अँप चालवणारे सचिन टेके म्हणाले की अँपमध्ये अश्लील आणि वादग्रस्त चॅट असेल तर ते हटवता येतात. प्रवासी एकमेकांना टीसीबाबत माहिती देत असतील त्यात काहीच करता येत नाही असे टेके म्हणाले.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने UTS अँप बनवले आहे. या अँपमधून प्रवशांना आपल्या मोबाईलमध्येच तिकीट किंवा पास काढता येतात. हे तिकीट प्रवासी स्टेशनवरूनही काढू शकता. त्यासाठी रेल्वेने स्टेशन्सवर क्यु आर कोड लावले आहेत. अनेक प्रवाशांनी या क्यु आर कोडचे फोटो काढून ठेवले आहेत. टीसी असल्याचे कळताच हे प्रवासी कुठल्याही स्थानकावरून तिकीट काढतात. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत नाही.
Facebook Comments Box