



मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’ या मिनी टॉय ट्रेन’ मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.