रत्नागिरी:कोकण रेल्वेमार्गावरील विन्हेरे स्थानकावर पॉईंट क्र. १२० च्या बदल्याचे तांत्रिक काम (NI Block) हाती घेण्यात येणार आहे. ३ जानेवारी २०२६ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या कामामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार असून, नेत्रावती एक्सप्रेस विलंबाने धावणार असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी दिली आहे.
गाड्यांच्या वेळापत्रकातील बदल खालीलप्रमाणे:
विन्हेरे स्थानकावरील कामामुळे गाडी क्र. १६३४६ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस) खालीलप्रमाणे थांबवून (Regulated) चालवण्यात येईल:
२ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: रत्नागिरी ते खेड दरम्यान ६० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.
३ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: चिपळूण ते खेड दरम्यान ३० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.
४ जानेवारी २०२६ रोजी सुटणारी गाडी: रत्नागिरी ते खेड दरम्यान ९० मिनिटे थांबवून चालवण्यात येईल.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी. तांत्रिक कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनातर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.


