मडगाव: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने जादा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल आणि रत्नागिरी-पनवेल दरम्यान मेमू (MEMU) स्पेशल ट्रेनचा समावेश आहे.
१. मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक स्पेशल (01106 / 01105)
गाडी क्र. 01106: मडगाव येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०७:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01105: पनवेल येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १९:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता मडगावला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा:
करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण.
डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ शयनयान/Sleeper, २ एसएलआर).
२. रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल (01158 / 01157)
गाडी क्र. 01158: रत्नागिरी येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:१० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01157: पनवेल येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी दुपारी १६:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा:
भोके, उक्षी, संगमेश्वर रोड, कडवई, आरवली रोड, सावर्डे, कामथे, चिपळूण, अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे.
डब्यांची रचना: एकूण ०८ मेमू डबे.
प्रवाशांना आवाहन: होळीच्या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


