मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (द्विसाप्ताहिक)
गाडी क्रमांक ०१०४९ मुंबई CSMT–मडगाव विशेष ही ३ मार्च २०२६ (मंगळवार) आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी मुंबई CSMT येथून पहाटे ००:३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
परतीची ०१०५० मडगाव–मुंबई CSMT विशेष ही ३ व ६ मार्च रोजी मडगावहून १६:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी या स्थानकांवर थांबा असेल.
या गाडीची रचना एकूण २० डबे असून त्यात ३ टियर एसी (इकॉनॉमी) – १८ डबे आणि जनरेटर कार – २ डबे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
गाडी क्रमांक ०१०४७ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव विशेष ही ७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री २२:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
परतीची ०१०४८ मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी १८:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी येथे थांबा असेल.
या गाडीची रचना २२ डबे अशी असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ डबा असेल.


