Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway | रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित मेमूच्या ४ विशेष फेऱ्या

Konkan Railway: कोकणातील होळी सण पाच ते नऊ दिवसांपर्यंत साजरा होतो. अनेक ठिकाणी उद्या शनिवारी रंगपंचमी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते चिपळूण /रत्नागिरी या दरम्यान जाता येता या गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष चिपळूण येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी २०:५० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे येथे थांबेल.
२) गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष पनवेल येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी २१:०० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
वरील अनारक्षित स्पेशलची रचना: एकूण ८ मेमू डबे.
वरील ट्रेनच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसची तिकिटे मिळता मिळेनात; डबे वाढविण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.

या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.

अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.

Loading

Loksabha Election 2024: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी शिंदेंकडून जाहीर

Loksabha Election 2024:लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. 22 जागा मिळाव्यात यासाठी शिंदे गट आग्रही होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना 12 ते 13 जागांवरच समाधान मानावं लागू शकतं. अशातच पहिल्या यादीत शिंदे गटाने केवळ आठच उमेदवार जाहीर केले आहे.

जाहीर केलेले उमेदवार

मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे

कोल्हापूर – संजय मंडलिक

शिर्डी – सदाशिव लोखंडे

बुलढाणा – प्रतापराव जाधव

हिंगोली – हेमंत पाटील

रामटेक – राजू पारवे

हातकणंगले – धैर्यशील माने

मावळ – श्रीरंग आप्पा बारणे

हे आठ उमेदवार शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहेत.

 

Loading

Railway PRS system | प्रवासी आरक्षण प्रणाली पाच तासांसाठी बंद

PRS Downtime : रेल्वेच्या संकेतस्थळावरून आज रेल्वे प्रवासासाठी तिकिट आरक्षित करण्याचा तुमचा बेत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री रेल्वेची पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (Railway PRS system) पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे आता आपल्या टिकिट सिस्टिम आणि ट्रेन क्रमांक अपग्रेड करण्यासाठी तांत्रिक बदल करणार आहे. त्यासाठी तिकिट आरक्षण यंत्रणा आज रात्री ठीक ११:४५ ते उद्या पहाटे ०४:४५ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या मध्य रेल्वे, पाश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे आणि पाश्चि मध्य रेल्वेचे प्रवासी तिकीट आरक्षण, टिकिट रद्द करणे, रेल्वेबाबतची चौकशी आदी सेवाही बंद असणार आहे.  मध्य रेल्वे प्रशासनाने या बाबतची माहिती ट्विटर X वर पोस्ट केली आहे.

 

 

Loading

ठाणे रेल्वे स्थानक फलाट रुंदीकरण: मांडवी एक्सप्रेसच्या फलाट क्रमांकामध्ये बदल

   Follow us on        

ठाणे, दि. २८: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या कामामुळे येथून जाणार्‍या काही गाड्यांचे सध्या असलेले फलाट Platform बदलण्यात आले आहेत. फलाट क्रमांक पाचवर येणार्‍या गाड्या सात नंबर फलाटावर वळविण्यात आल्या आहेत.

या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस (10103)ठाणे स्थानकातून आज दिनांक 28 मार्च 2024 पासून 06 एप्रिल 2024 पर्यत फलाट क्रमांक(05) पाच ऐवजी सात (07)वरून सोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघ (रजि.) तर्फे देण्यात आली आहे. ठाण्यातील प्रवाशांनी या बदलाची दखल घेऊन आपला त्रास टाळावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

Loading

Sindhudurg | ‘डोंगराळ’ च्या सवलतींमुळे जिल्ह्यातील शाळा वाचतील

   Follow us on        
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात येतो. शाळांच्या सुधारित संचमान्यतेत हा उल्लेख चुकून राहिला होता. या संदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सुधारित संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाची सवलत मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
सध्या शाळांच्या सुधारित सुधारित संच मान्यतेमुळे सिंधुदुर्गातील शाळा अडचणीत येणार असल्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात केसरकर यांना विचारले असता, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्गम भागातील शाळांना वीसच काय, त्याखालील पटसंख्या भरणे मुश्कील आहे. मान्यतेत या जिल्ह्याला पूर्वी सवलत देण्यात आली होती. डोंगराळ भागाचा उल्लेख सुधारित संचमान्यतेत करण्यात आला नव्हता. ती सुधारणा आता करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांबाबतही अशी सुधारणा करण्यात येणार आहे. या शाळांनाही पटसंख्येचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांनाही पूर्वीची सवलत राहणार आहे. सध्याच्या शाळांचे मुख्याध्यापकपद सुधारित संचमान्यतेमुळे निष्कासित होणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Loading

एसी डब्यांच्या जागी जनरल आणि स्लीपर डबे; गोवा एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल

   Follow us on        

गोवा: रेल्वे प्रशासन एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि जनरल डब्यांच्या संख्येत कपात करून त्याजागी एसी डबे जोडून सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक त्रासदायक बनवत आहे असा आरोप केला जात आहे. मात्र एका गाडीच्या एसी डब्यांत कपात करून त्या जागी सामान्य आणि सेकंड स्लीपर डबे जोडून मार्गावर प्रवास करणार्‍या सामान्य प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. गाडी क्रमांक 12779 / 12780 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत हा बदल करण्यात आला आहे. एक दोन नाही तर एसीच्या एकूण सहा डब्यांचे रूपांतर सेकंड स्लीपरच्या चार आणि सामान्य श्रेणी General च्या एकूण दोन डब्यांत कायमस्वरूपा साठी करण्यात आले आहे.

दिनांक 16 जून 2024 पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.

आताची संरचना 

फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 02 + थ्री टायर एसी – 04 + ईको. थ्री टायर एसी – 04 + स्लीपर – 02 + सामान्य – 02  + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार  – 02 असे मिळून एकूण LHB 20 डबे

 

सुधारित संरचना 

फर्स्ट एसी – 01 + टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 01 + ईको. थ्री टायर एसी – 02 + स्लीपर – 06 + सामान्य – 04  + पॅन्टरी कार – 01+ पार्सल व्हॅन – 02 + जनरेटर कार – 01 + एसलआर  –  01असे मिळून एकूण LHB 20 डबे

 

 

 

 

 

 

Loading

Breaking | लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाची यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 16 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.”

ठाकरेंचे कोणते शिलेदार लोकसभेच्या रिंगणात? 

  • बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
  • यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
  • मावळ – संजोग वाघेरे-पाटील
  • सांगली -चंद्रहार पाटील
  • हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
  • छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
  • धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  • शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
  • नाशिक – राजाभाई वाजे
  • रायगड – अनंत गीते
  • सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
  • ठाणे – राजन विचारे
  • मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
  • मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
  • मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
  • परभणी – संजय जाधव
  • मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई 

 

Loading

Sawantwadi | कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव शनिवारी ३० मार्चला

   Follow us on        
सावंतवाडी, दि . २६: कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव शनिवारी दिनांक ३० रोजी साजरा करण्यात येणार आहे.  शुक्रवार दिनांक २९ पासूनच या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
शुक्रवारी (ता. २९) दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोलताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. ३०) हुडोत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळपासून श्री भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार आहे. याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत. शनिवारी (ता.३०) सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी व लुटूपुटूचा खेळ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ‘ही’ गाडी आता नव्या रुपात, एलएचबी कोचसह धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरून  जुन्या आयआरएस IRS रेकसह धावणाऱी एक गाडी आता आरामदायक मानल्या जाणार्‍या आधुनिक प्रणालीच्या एलएचबी  Linke Hofmann Busch (LHB) coaches रेकसह धावणार आहे.

या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 20910 / 20909 पोरबंदर – कोचुवेल्ली – पोरबंदर साप्ताहिक एक्सप्रेस एलएचबी डब्यांसह धावणार आहे.

गाडी क्रमांक 20910 पोरबंदर – कोचुवेल्ली एक्सप्रेस दि. 28 मार्च 2023 च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक 20909 कोचुवेल्ली – पोरबंदर  दिनांक 31 मार्चच्या फेरीपासून एलएचबी रेक सह धावणार आहे.

ही गाडी सध्या 23 डब्यांसहित चालविण्यात येत आहे. मात्र तिचे LHB रेक मध्ये रुपांतर करताना तिचा एक सेकंड स्लीपर डबा कमी करण्यात आला असून ती 9 स्लीपर डब्यांऐवजी 8 स्लीपर डब्यांसहित धावणार आहे.

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search