रत्नागिरी दि. २४: शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे.कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आज शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणार्या वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.
आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.
मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने
१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.
२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.
३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.
४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.
५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.
६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.
७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.
८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.
९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.
१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.
११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.
१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.
१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.
१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.
१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.
१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.
१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.
१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.
२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.
२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.
२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.
अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर दि. 24 ते 29 फेब्रुवारी 2024 असा तब्बल सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कर्नाटकमध्ये नंदिकुर रेल्वे स्टेशन येथे मार्गावरील पॉईंट बदलण्याच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात असल्याची माहिती कोकणरेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या खालील सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12978 Ajmer – Ernakulam Jn. Express
दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी उडुपी स्थानकावर वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
२) Train no. 16337 Okha – Ernakulam Jn. Express
दिनांक 24 फेब्रुवारीला प्रवास सुरू करणार्या या गाडीला मडगाव ते उडपी दरम्यान 45 मिनिटे थांबवून ठेवले जाणार आहे.
३) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी मंगळुरू ते मुलकी या विभागात 100 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
वरील तीन गाड्या व्यतिरिक्त मडगावच्या पुढे धावणाऱ्या इतर तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.
भाविकांसाठी खुशखबर! आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाडीची घोषणा – Kokanai
सविस्तर वृत्त👇🏻 https://t.co/BL8jbsHFwR#konkanrailway #आंगणेवाडीजत्रा #specialtrains pic.twitter.com/nWajfp9Mu1
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) February 22, 2024
दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
तर हे अपघात टाळता येणे शक्य
वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.
पहाटे सुटणार्या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा
जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.