Category Archives: मुंबई
मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.
दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.
प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे.
मुंबई :मुंबई लोकल मार्गावर सुरू केलेल्या एसी लोकल्सना प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वे मार्गावरील अजून १० गाड्यांचे रूपांतर एसी लोकल्समध्ये करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या एकूण एसी गाड्यांची 56 वरून 66 ईतकी होणार आहे. हा बदल दिनांक 06 नोव्हेंबर पासून अमलात आणला जाणार आहे.
या एसी लोकल सोमवार ते शनिवार धावतील आणि रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी धावणार नाहीत.
खालील गाड्या दिनांक 06 नोव्हेंबर पासून एसी लोकल म्हणुन चालविण्यात येणार आहेत
1)गाडी क्रमांक K-14 CSMT स्लो लोकल जी कल्याणहून 07.16 वाजता सुटते आणि 8.45 वाजता CSMT ला पोहोचते.
2)गाडी क्रमांक K-25 कल्याण स्लो लोकल जी CSMT वरून 08.49 वाजता सुटते आणि कल्याणला 10.18 वाजता पोहोचते.
3)गाडी क्रमांक K-50 CSMT स्लो लोकल जी कल्याणहून 10.25 वाजता सुटते आणि 11.54 वाजता CSMT ला पोहोचते.
4)गाडी क्रमांक A-27 अंबरनाथ स्लो लोकल जी CSMT वरून 11.58 वाजता सुटते आणि अंबरनाथला 13.44 वाजता पोहोचते.
5)गाडी क्रमांक A-42 CSMT स्लो लोकल जी अंबरनाथहून 14.00 वाजता सुटते आणि 15.47 वाजता CSMT ला पोहोचते.
6)गाडी क्रमांक DL-33 डोंबिवली स्लो लोकल जी CSMT वरून 16.01 वाजता सुटते आणि 17.20 वाजता डोंबिवलीला पोहोचते.
7)गाडी क्रमांक DDL-2 परळ स्लो लोकल जी डोंबिवलीहून 17.32 वाजता सुटते आणि 18.38 वाजता परळला पोहोचते.
8)गाडी क्रमांक DK-15 कल्याण स्लो लोकल जी परळहून १८.४० वाजता सुटते आणि १९.५४ वाजता कल्याणला पोहोचते.
9)गाडी क्रमांक PK-22 परळ स्लो लोकल जी कल्याणहून 20.10 वाजता सुटते आणि 21.25 वाजता परळला पोहोचते.
10)गाडी क्रमांक PK-23 कल्याण स्लो लोकल जी परळहून 21.39 वाजता सुटते आणि कल्याणला 22.53 वाजता पोहोचते.
Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट#centralrailway #RailMinIndia#konkanrailway pic.twitter.com/ykdmBAFbJI
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) October 20, 2023
ठाणे : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यात अनेक मराठी शहरांच्या नावाचा चुकीचा उच्चार करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर सरकारी कार्यालयात, कागदोपत्री आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दर्शक फलकांवर ही चुकीची नावे वापरून तीच कायम करण्यात आल्याचे प्रकारही घडत आहेत.
रेल्वे प्रशासना सुद्धा या गोष्टीत मागे नाही आहे. रेल्वेमध्ये परप्रांतीय कर्मचाऱ्यांचा जास्त भरणा असल्याने रेल्वेत असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत.
ठाणे ते पनवेल लोकल रेल्वे प्रशासनाने असाच एक प्रकार केल्याचा नेरुळ या स्थानकाच्या नावाच्या बाबतीत घडला आहे. या स्थानकाचे नाव ‘नेरूळ’ असताना ते वेळापत्रक दर्शिकेत चुकीच्या पद्धतीने म्हणजे ‘नेरूल’ असे दाखविण्यात आले आहे.
याविरोधात मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे. नेरूळ गंतव्य स्थानकाच्या नावाचा अचूक मराठी देवनागरी लिपीत वापर करण्यात यावा.विहीत मुदतीत बदल न केल्यास पीजी पोर्टलवर तक्रार नोंद करण्यात येईल. असा इशारा या समितीने दिला आहे
Konkan Railway News :कोंकण रेल्वे मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस या जलद गाडीला पनवेल या स्थानकावर थांबा मिळणार आहे. 26 ऑगस्ट पासून हा बदल अमलात आणला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
आठवड्यातुन दोन दिवस धावणारी या गाडीची पनवेल स्थानकावर थांबण्याची वेळ जाहीर करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून रात्री 20:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12223 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ रात्री 02:25 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.
परतीच्या प्रवासात एर्नाकुलम स्थानकावरून रात्री 21:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12224 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ दुपारी 15:30 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.
अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेस ओळखली जाते. एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस 12223/24 ही गाडी एलटीटी – एर्नाकुलम या स्थानकादरम्यान ही फक्त रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबते. एलटीटी वरून सुटून ही गाडी डायरेक्ट रत्नागिरी स्थानकावर थांबत होती. या गाडीला पनवेल येथे थांबा मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होती. रेल्वे बोर्डाने ही मागणी पूर्ण केली आहे. मात्र दक्षिणेकडील कुन्नूर, कासारगोड आणि शोरानूर या स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष केले आहे.



Mumbai Local Train News : लोकलने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. गर्दीच्या वेळी लोकलला लटकत प्रवास टाळण्यासाठी व एका लोकल ट्रेनमधून अधिकाधिक प्रवाशांना आरामशीर प्रवास करता यावा, याकरता पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा नव्या बदलासह रेल्वे धावणार आहेत.
उपनगरीय वाहतूक सेवा लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. ४९लोकल ट्रेन १२ डब्यांवरून १५ डब्यांच्या होणार आहेत. त्यामध्ये मुख्यपणे चर्चगेट ते विरार दरम्यानची स्लो लाइन आणि केवळ १५ फास्ट लाइन सेवांचा समावेश आहे.
खालील गाड्या उद्या १५ ऑगस्टपासून या बदलानुसार धावणार आहेत.












