शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आज गुवाहाटीला पोचले आणि शिंदे गटात सामील झाले आहेत. हॉटेल मध्ये पोचल्यावर एकनाथ शिंदेनी त्यांची गळाभेट घेतली. सकाळ पासून उदय सामंत नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरत मार्गे गुवाहाटीला पोचल्याची माहिती आली आणि तसे फोटोस आणि व्हिडिओस सोशल मीडिया वर पोस्ट पण झाले आहेत. विशेष म्हणजे उदय सामंत काळ शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित होते. आतापर्यंत शिंदे गटात एकूण ८ मंत्री सामील झाले आहेत.
अनिल परब आणि सुनील तटकरे यांचा त्यांच्या कामात नेहमी हस्तक्षेप असायचा म्हणून आपण नाराज आहे असे त्यांचे म्हणणे होते. गुवाहाटीला जाण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेचे आमदार राजन साळवी याना फोन करून माझ्यासोबत येणार का अशी विचारणा केली होती. पण राजन साळवी यांनी नकार दिला.
शिवसेनेत आता फक्त ४ मंत्री उरले आहेत. विधान सभेतून निवडून आलेल्या मंत्र्यांपैकि फक्त आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री उरले आहेत. उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सुभाष देसाई हे विधान परिषदेतून निवडून आलेले मंत्री आहेत. उदय सामंत यांच्या जाण्याने शिवसेनेला अजून एक धक्का बसला आहे.
उद्या सकाळी ११ वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत असे सांगण्यात येत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad