मुंबई – आज विधानसभेच्या अध्यक्ष्यपदी बहुमताने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत.
नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे 20 वे अध्यक्ष आहेत. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मतं मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.
राहुल नार्वेकर यांचा अल्प परिचय आणि राजकीय कारकीर्द.
जन्म – ११ फेब्रुवारी १९७७
जन्मठिकाण – मुंबई
शिक्षण – B COM , LLB
ज्ञात भाषा – मराठी, हिंदी आणि इंग्रजी
कुटुंब – पत्नी आणि एक मुलगी.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे ते जावई आहेत
राहुल नार्वेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
नार्वेकर हे एक वकील सुद्धा आहेत.
राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेचे नगरसेवक आहेत.
आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर हे खास मित्र होते.
राजकीय कारकीर्द
राहुल नार्वेकरांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच केली. १५ वर्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेत काम केलं.
नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला,राष्ट्रवादीकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक मावळमधून लढवली. पण शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून त्यांचा पराभव झाला.
नंतर ३ वर्षे ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे सदस्य राहिले.
२०१९ च्या निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
२०१९ साली ते भाजपच्या तिकिटावर कुलाबा मतदारसंघातून आमदार बनले.
Facebook Comments Box
Related posts:
सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील २ गाड्यांच्या अन्य श्रेणीचे काही डबे जनरल डब्य...
महाराष्ट्र
पालघर येथील बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४०० हून जास्त खेळाडूंची उपस्थिती.
महाराष्ट्र
रविवारी दिवा स्थानकावर मेगाब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' गाड्यांवर परिणाम
महाराष्ट्र
Vision Abroad