राज्यात निर्माण झालेल्या राजकिय परिस्थिती मुळे कोणताही अनुचित प्रकार जिल्हय़ात घडू नये म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या अधिकारकक्षेत जिल्हय़ात मनाईचे आदेश जाहीर केले आहेत. जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी खालील गोष्टींवर मनाई आणली आहे. ही मनाई २७ जुलै पर्यंत असेल असे त्यांनी जाहीर केले आहे.
कलम ३७/१
1. शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुऱ्या, काठ्या, लाठ्या आणि कोणतेही शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू बाळगणे.
2. अंग भाजून टाकणारा किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.
3. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडण्याची साधने किंवा उपकरणे सोबत बाळगणे किंवा तयार करणे.
4. व्यक्तींची प्रतिमा, पुतळे किंवा आकृती यांची प्रदर्शने करणे. (ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावतील)
5. सार्वजनिक रीतीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाजवणे.
6. सभ्यता व निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे तयार करणे किंवा सोंग आणणे किंवा कोणतेही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम ३७/३
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे किंवा सभा घेणे.
Vision Abroad