गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने MEMU विशेष रोहा-चिपळूण-रोहा (01157/01158) ह्या गाडीचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या आधी ही गाडी ८ डब्यांची चालणार असे घोषित करण्यात आले होते ती आता १२ डब्यांची केली आहे.
मागच्याच आठवड्यात कोकण रेल्वेने ६१०११ /६१०१२ दिवा-रोहा-दिवा ही गाडीपुढे चिपळूण पर्यंत विस्तारित केली होती. हीच गाडी पुढे रोहा ते चिपळूण आणि चिपळूण ते रोहा ०११५७/०११५८ ह्या नंबरने चालविण्यात येणार आहे.
Related :गणेशोत्सवासाठी वेस्टर्न लाईनला राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या अजून विशेष गाडया
०११५७ ही गाडी रोह्यातून सकाळी ११.०५ ला सुटेल ती चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल. ०११५८ ही गाडी ३.४५ ला चिपळूण येथून सुटून १६.१० ला रोह्याला पोहोचेल.
माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड ह्या स्टेशन वर ह्या गाड्या थांबतील.
गणेशभक्तांना कोकण रेल्वेची अजून एक खुशखबर. ह्या गाडीचा विस्तार
गणेशभक्तांसाठी खुशखबर – ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही
Vision Abroad