मराठीतील ज्येष्ठ कलाकार प्रदीप पटवर्धन यांचे आज त्य्नाच्या राहत्या घरी गिरगाव मुंबई येथे आज सकाळी निधन झाले. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मराठीतील हास्य कलाकार अशी त्यांची ओळख होती. त्यांचे वय ६५ वर्षे होते.
त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. ‘मोरूची मावशी’ या नाटकातील त्यांचे काम आजही स्मरणात राहील. या नाटकातील ‘भैया पाटील’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष आवडीची. भरत जाधव, विजय चव्हाण, विजय पाटकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसह त्यांनी रंगभूमी गाजवली आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘लावू का लाथ’ या सिनेमातील त्यांच्या रंजक भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच हसवलं.
एक फुल चार हाफ (१९९१), चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध,पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रंगभूमी अन् विविध सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रदीप पटवर्धन यांनी अखेरच्या क्षणी मात्र चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या जाण्याने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.
Facebook Comments Box