मुंबई- मीविआ सरकारात मंत्री राहिलेल्यानाच मंत्रीपदे दिल्याने शिंदे गटातील काही नेते नाराज झाल्याचे समजते आहे. शिंदे यांना सुरवातीला साथ देणाऱ्या आमदारांना डावलून नंतर त्यांच्या गटात उशिरा आलेल्या आमदारांना मंत्रीपदे दिल्याने हि नाराजी आहे. काही आमदारांनी परत शिवसेनेत जाण्याची आपआपसात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
जुन्याच मंत्र्यांना मंत्रिपद दिले तर नवीन सरकार स्थापून नेमका बदल काय झाला असा प्रश्न शिंदे गटातील आमदारांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडू यांना मंत्री मंडळाच्या पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलेले नाही आहे. ह्यासंबंधी आमदार बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी खालील विधान केले.
बच्चू कडू हा मंत्रीपदापेक्षा मोठा आहे. आमचा उद्देश मंत्रिपदासाठी नाही होता.मंत्रिपद दिले तरी चांगले, नाही दिले तरी चांगले, पण आशा करतो कि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिपदासाठी दिलेला शब्द पाळतील.
आज सकाळी मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या मंत्र्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे
शिंदे गटातील मंत्री
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
दादा भुसे
दीपक केसरकर
उदय सामंत
गुलाबराव पाटील
संदीपान भुमरे
तानाजी सावंत
संजय राठोड
भाजपकडून मंत्री
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे
Facebook Comments Box