ठाणे:भाजप मित्रपक्षांना कधी संपवण्याच्या प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रचे उदाहरण पाहता आमचे संख्याबळ जास्त असताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. कालच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांच्या 9/9 नेत्यांनी मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या. बिहारचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर आमचे संख्याबळ जास्त असताना JDU ह्या आमच्या मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद दिले. असे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ”भाजप मित्रपक्षांना संपवते” ह्या विधानावर उत्तर दिले आहे. लोकमत च्या ठाण्यातील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार असेही बोलले होते की आपण जेव्हा कॉंग्रेस सोडली आणि नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह घेतले, पण शिंदे गट ह्या विरुद्ध करत आहे.
ह्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली तेव्हा कायदे आज आहेत तसे नाही होते. पक्षांतरबंदी कायद्या मध्ये बदल करण्यात आला आहे, त्यामुळे शिवसेनेला ही कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. शरद पवारांनी ह्या दोन्ही घटनेचे एका तराजूत तुलना करू नये.
शरद पवारांचे दुखणे जरा वेगळे आहे ते सर्वाना माहीत आहे असा खोचक टोला पण त्यांनी मारला.
Vision Abroad