सावंतवाडी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या मतदारसंघात जाहीर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ ह्याबद्दल त्यांनी आजून काही सांगितले नाही आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून चालत आलेल्या महाराष्ट्र राज्यातील सत्ता राज्य नाट्यामध्ये दीपक केसरकर यांचा रोल महत्वाचा राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ह्या गटाची एक महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आहे.
दीपक केसरकर हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा मतदारसंघात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही सभा किंवा शक्तिप्रदर्शन केले नव्हते. ह्याच दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा झाली होती. ह्या सर्व गोष्टींमुळे दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघातील शक्ति कमी झाल्याची विधाने त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणुन हा जाहीर मेळावा म्हणजे एक प्रकारचे शक्ति प्रदर्शन असेल असे बोलण्यात येत आहे.
शिंदेगट सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते. आता दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळाले आहे. ह्या सर्वाचा फायदा मतदारसंघात विकास कामांसाठी होईल अशी आशा आहे असे बोलले जात आहे.
Related news – सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभे राहणार – मुख्यमंत्री
Vision Abroad