मेट्रो 3 च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील प्रस्तावित जागा कोणत्याही दृष्टीने योग्य नसून फक्त आपल्या ‘EGO’ साठी ठाकरे सरकार आरे येथील कारशेडला विरोध करून कांजूरमार्ग येथील जागेसाठी प्रयत्नशील होते असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मविआ सरकार सत्तेत असताना त्यांनी कारशेड च्या जागेच्या प्रश्नासाठी एक समिती नेमली होती त्याच समितीने ह्यावर आपला अहवाल दिला होता. त्यात त्यांनी स्पष्ट नमूद केले होते की हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आजून ४ वर्षे लागतील आणि प्रचंड खर्च होईल आणि व्यवहार्यदृष्ट्या पाहता योग्य नाही. त्यांचाच समितीने हा निर्णय दिला असताना कांजूरमार्गच्या जागेला मेट्रो 3 च्या कारशेड साठी निवडणे हा निर्णय केवळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त आपल्या ‘EGO’ साठी घेतला आहे.
आरे येथील कारशेडचे काम 29% पूर्ण झाले आहे, एकूण प्रकल्पाचे काम 85% पूर्ण झाले आहे. ह्यापुढे एकही झाड ह्या प्रकल्पासाठी तोडावे लागणार नाही. आणि आता जर कारशेड तिकडे हलवायचे म्हंटले तर त्यासाठी बराच खर्च करावा लागेल. सामान्य जनतेच्या खिशातून आलेल्या पैशाची अशी उधळण करता येणार नाही असे ते पुढे म्हणाले.
Facebook Comments Box
Vision Abroad