मुंबई :खरी शिवसेना कोणती आणि निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा हा वाद चालू असताना शिंदे गटाने नवीन प्लॅन आखला आहे. शिंदे गट शिवसेना भवनावर दावा करणार असे बोलले जात होते पण आज आज एक नवीन माहिती समोर आली आहे. शिंदेगट आता दादर आणि कुलाबा येथे प्रतिसेनाभवन उभे करणार आहे आणि त्यासाठी जागेचे संशोधन चालू केले गेले आहे. एवढेच नाही तर मुंबई मध्ये सर्व ठिकाणी शिंदे गट आपल्या गटाच्या शाखा खोलणार आहेत. अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहता त्यांना एका अशा भवनाची गरज आहे जे आमच्या पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय समजले जाईल. असे ते पुढे म्हणाले.
शिवसेनाभवन हे पक्षाचे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते, ह्या ठिकाणी पक्षासंबंधी सर्व बैठकी आणि निर्णय घेतले जातात. शिवसेनेच्या शाखा ह्या शिवसेना पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेला जोडण्याचा एक मुख्य दुवा समजला जातो. बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष ह्या शाखेंद्वारे घरोघरी पोहचवला होता. आता त्याची पुनरावृत्ती शिंदेगट आपल्या गटाचे राजकारणातील स्थान मजबूत करण्यासाठी करणार आहे. सुरवातीला मुंबईमध्ये सर्व विभागात ह्या शाखा असतील, तसेच प्रत्येक शाखेत शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी ह्यावर टीका केली आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी हे मुर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असे ते म्हणाले.
Facebook Comments Box
Vision Abroad