ठाणे :मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कळवा ह्या दोन स्टेशन दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. दोन्ही जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल्स खूप धीम्या गतीने चालविण्यात येत आहेत. सर्व गाड्या सुमारे एक ते दीड तास उशिराने चालत आहेत. लोकल्स च्या एका मागोमाग रांगा लागल्या आहेत. काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
आज सध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळात वाहतुक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. सर्व स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून वाहतुक सूरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरात लवकर वाहतुक पूर्वपदावर आणली जाईल अशी संबधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
"यापुढे मी मराठी बोलण्यास....." नालासोपाऱ्यात टीसीने प्रवाशाकडून लिहून घेतला धक्कादायक माफीनामा
महाराष्ट्र
Mumbai Local | उद्यापासून मध्य रेल्वेचे एकापेक्षा दोन मोठे ब्लॉक; लोकल्सच्या ९३० फेर्या रद्द, प्रवा...
मुंबई
Mumbai Local: मध्य रेल्वे मार्गावरील १४ लोकल गाड्यांच्या जागी एसी लोकल्स धावणार; वेळापत्रक इथे वाचा
मुंबई

