गोवा : राज्य सरकारने बिअर वरच्या उत्पादन शुल्क करामध्ये (Excise Duty) वाढ करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात बिअर च्या किमती वाढणार आहेत. हि वाढ प्रति बल्क लिटर मागे १० ते १२ रुपये असेल. इतर मद्यावरच्या उत्पादन शुल्कात सध्यातरी कोणताही बदल करण्यात येणार नाही असे सरकारने म्हंटले आहे.
गोवा हे एक पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पूर्ण जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनाला चालना देण्याचा एक भाग म्हणून गोवा सरकारने राज्यात मद्यावर इतर राज्यापेक्षा कमीत कमी कर लावले आहेत त्यामुळे इथे मद्य जवळ जवळ ५०% कमी किंमतीत भेटते.
पण ह्या सर्वच फायदा सीमेलगत राज्यातील काही तस्कर घेत असल्याचे प्रकार वाढत चालले होते. हल्लीच महाराष्ट्राच्या नवीन सरकारने अशा तस्करीला आळा घालण्यासाठी अशा तस्करांना कडक कारवाई करण्यासाठी ‘मोक्का’ या कायद्यानुसार कारवाई करता येईल यासंबधी विचार करत असल्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र सरकारच्या हा निर्णयाच्या धर्तीवर गोवा सरकार किंमतील फरक कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहे.
ह्याआधी नॉर्मल बिअर जिला ३० रुपये उत्पादन शुल्क कर होता तो आता ४२ रुपये प्रति बल्क लिटर झाला आहे. स्ट्रॉग बिअर चा उप्तादन शुल्क आता ६० रुपये करण्यात आले आहे, ह्या आधी हे शुल्क ५० रुपये एवढे होते.
Vision Abroad