दापोली :शिवसेनेचे नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुड इथल्या साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट तोडण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागवल्या आहेत. चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वृत्तपत्रात रविवारी (20 ओक्टोम्बर) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २७ ओक्टोम्बर २०२२ सकाळी १० वाजता ते १० नोव्हेंबर 2022 या कालावधीपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप
रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले होते.
अनिल परब यांची ईडी चौकशी
शिवसेना नेते अनिल परब यांची दापोली रिसॉर्ट प्रकरणी याआधी ईडीने चौकशी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री असताना अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आणि खासगी निवासस्थानी ईडीकडून मे महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परब यांची तीन वेळा ईडी चौकशी करण्यात आली होती. साई रिसॉर्ट आपले नसल्याचा दावा परब यांनी याआधीच केला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad