सिंधुदुर्ग :६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि प्राथमिक फेरी मामा वरेकर नाट्यगृह, मालवण येथे होणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणारी हि स्पर्धा २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. दरदिवशी संध्याकाळी ७ वाजता एक स्पर्धक संस्था आपले नाटक सादर करणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली फाईल डाउनलोड करा.
६१ व्या प्राथमिक फेरी-सिंधुदुर्ग.pdf
महाराष्ट्र सरकार १९६१ पासून राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे ६१ वे वर्ष आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad