मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या डब्यातून कायम दाटीवाटीचा आणि असह्य वाटणारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर, या प्रवाशांचा प्रवास लवकरच गर्दीमुक्त होणार आहे. पश्चिम रेल्वेने बारा डब्ब्यांची लोकल आता १५ डब्यांचा लोकलमध्ये परावर्तीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या आठवड्यापासून 15 डब्बांच्या 26 लोकल पश्चिम मार्गावर धावणार असून, यापैकी १० सेवा जलद मार्गावर मार्गावर धावणार आहे. या निर्णयामुळे लोकलमधील प्रवाशी वहन क्षमता २५ टक्यांनी वाढणार आहे. २१ नोव्हेंबर २०२२ पासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,एकुण २६ उपनगरीय लोकलला आता 13 ऐवजी 15 डब्बे लावले जाणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक लोकलची आसन क्षमता २५ टक्यांनी वाढेल. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात सध्या १५ डब्यांच्या एकूण उपनगरीय लोकल सेवांची संख्या १०६ आहे. आता सोमवारपासून पंधरा डब्याचा २६ लोकल सेवांची भर पडल्यानंतर या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या एकूण उपनगरीय लोकल सेवांची संख्या १३२ वर पोहचणार आहे. परंतु एकूण उपनगरीय लोकल सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही, म्हणजे ६९ एसी लोकल सेवांसह दररोज १३८३ सेवा असणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहेत.
Vision Abroad