मुंबई :राज्यात विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 60 हजार शिक्षकांना होणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या संदर्भात सांगितल्याप्रमाणे, 20 ते 40 टक्के आणि 40 ते 60 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान याचा शासन निर्णय लवकरच निघणार असल्याचेही दीपक केसरकर यांनी संगीतले.
अशातच पात्रता पूर्ण न करु शकलेल्या संस्थांना यातून वगळण्यात येईल. त्या शाळांव्यतिरिक्त सर्वच्या सर्व शाळांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. जवळपास 1 हजार 160 कोटी रुपयांचे हे पॅकेज शिक्षकांसाठी जाहीर करत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. दरम्यान ज्यांनी या अनुदासाठी मागणी केली नव्हती त्यांनाही या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
Vision Abroad