मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर असलेले भगतसिंग कोश्यारी यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे. हे विधान त्यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोश्यारींचं विधान
तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.
ह्याआधी पण त्यांनी महाराष्ट्रविरोधी काही वादग्रस्त विधाने केली होती. पण त्यावर सर्व स्तरातून विरोध झाल्याने त्यांनी माफी मागितली होती. राज्यपाल पदावर असलेल्या व्यक्तिने अशी वादग्रस्त आणि समाजात तणाव निर्माण होण्यास कारणीभूत होणारी विधाने करणे खूपच चुकीचे ह्या पदाच्या प्रतिमेला काळिमा फासण्यासारखे आहे.
Vision Abroad