येत्या ६ डिसेंबरला स्वराज्यभूमी कोकण महोत्सव

मुंबई :देशाच्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कोकण प्रदेशाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण भारत देशाचे दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी कोकणात म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. , सरखेल कानोजी आंग्रे ,नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती नेताजी पालकर, महान सेनानी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके , मातृशक्तीचे देशातील सर्वात मोठे प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतरत्न विनोबा भावे ,भारतरत्न महर्षी कर्वे अशी अनेक नररत्न या देशाला कोकण प्रदेशाने दिली. या महान व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रपुरुषांना मानवंदनादेण्यासाठी भव्य स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आणि अभियान कोकण बिझनेस फोरम व मी मुंबई तर्फे  आयोजित करण्यात येत आहे.

हेही वाचा : पर्यटन संचालनालयामार्फत महाड येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क सहलीचे आयोजन

राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणिउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष सहकार्य या अभियानाला मिळणार आहे. कोकणचे सुपुत्र मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे या अभियानाचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेतील मा. प्रवीण दरेकर याचे संयोजक आहेत.यावेळी भव्य उद्योग प्रदर्शन , सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे

कोकणातील इतिहास संस्कृती परंपरा लोककला उद्योग यांचा भव्य महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. देशाचे उद्योग मंत्री नारायणराव राणे आणि त्यांचे एमएसएमई मंत्रालय या उपक्रमाला विशेष सहकार्य करत आहेत. राज्याच्या उद्योग मंत्री उदय जी सामंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर कोकण अंतर्गत कोकणातील तरुणांना कोकणात उद्योग उभारण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समन्वय याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी भव्य परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आमदार प्रसादजी लाड यांनी पुढाकार घेतला आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडेवरेकर यांची संपूर्ण टीम या उपक्रमात सहभागी झाली आहे.

 

स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा 

कालावधी :६ ते ९ डिसेंबर 

स्थळ : नेस्को कॉम्प्लेक्स ,वेस्टन एक्सप्रेस हायवे गोरेगाव

कार्यक्रमपत्रिका 

६ डिसेंबर

सकाळी ८-३०. भव्य उद्घाटन

प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक

माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब, महोत्सव प्रमुख, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब

 

संध्याकाळी ४ ते ६

स्वराज्यभूमी मंथन परिषद

प्रमुख अतिथी रघुजीराजे आंग्रे , सरखेल कान्होजी आंग्रे यांची वंशज. व अन्य प्रमुख व्यक्तिमत्वांचे वंशज

 

संध्याकाळी ६ ते ९

आंबा काजू उद्योग परिषद

प्रमुख अतिथी. माननीय गिरीशजी महाजन, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र

सचिव, / व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

 

दिनांक ७ डिसेंबर

सकाळी ११ ते दुपारी ४

कोकण मत्स्य उद्योग परिषद आणि निसर्ग संवर्धन परिषद

प्रमुख उपस्थिती वन आणि मत्स्य उद्योग मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब , सचिव- मत्स्य उद्योग विभाग / सचिव -वनविभाग

 

संध्याकाळी चार ते आठ

स्वराज्यभूमी सागरी परिषद

प्रमुख अतिथी. माननीय दादाजी भुसे बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन

सचिव बंदर विकास, सी ई ओ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड

 

गुरुवार दिनांक 8 डिसेंबर

सकाळी दहा ते दुपारी चार

स्वराज्य भूमी कोकण पायाभूत सुविधा व उद्योग विकास परिषद

प्रमुख उपस्थिती. 

सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र जी चव्हाण साहेब.

एम एम आर डी ए , सिडको , एमएसआरडीसी ,कोकण रेल्वे विविध विभागाचे प्रमुख.

एम एस एम इ , खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्योग संचालनालय विविध उद्योग विकासाच्या योजना आणि त्या विभागाचे प्रमुख.

 

संध्याकाळी चार ते आठ

स्वराज्यभुमी सीएसआर परिषद

कोकणातील मोठे उद्योग समूह आणि कोकणातील मोठ्या सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे स्नेहसंमेलन.

प्रमुख उपस्थिती

राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब

 

शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर

स्वराज्यभूमी पर्यटन उद्योग विकास परिषद

प्रमुख उपस्थिती मा. मंगल प्रभात लोढा साहेब, पर्यटन मंत्री, चिव पर्यटन विभागसं, चालक पर्यटन संचनालय

संध्याकाळी सहा वाजता भव्य समारोप

प्रमुख उपस्थिती महोत्सव प्रमुख आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री मा नारायणराव राणे साहेब

निमंत्रक /शब्दांकन  : माननीय संजय यादवराव, संयोजक आणि समन्वयक

 

सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म

https://docs.google.com/forms/d/17d47nRRv-3egyy80ZhYMH1dtl-_eFuvzwKxfqWa36rM/edit

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search