सिंधुदुर्ग :कोकणातील प्रत्येक गाव हा शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा आणि कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावं जेणेकरून कोकणातील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे असं प्रतिपादन “तिमिरातुनी तेजाकडे” संस्थेचे संस्थापक, सिंधुदुर्ग चे सुपुत्र व प्रसिद्ध, उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मा. श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार ) यांनी केले. कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या निशुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व्याख्यान ३ डिसेंबर २०२२ रोजी ते बोलत होते.
हेही वाचा :कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत रा. दळवी, कार्याध्यक्ष, कळसुली शिक्षण संघ, मुंबई, श्री जय दळवी, खजिनदार, कळसुली शिक्षण संघ मुंबई, श्री. के. आर. दळवी चेअरमन स्कूल कमिटी, श्री. नामदेव घाडीगावकर, उपाध्यक्ष, स्कूल कमिटी, श्री. रजनीकांत सावंत, स्कूल कमिटी सदस्य, श्री दयानंद सावंत, पोलिस निरीक्षक, भोईवाडा पोलिस स्टेशन मुंबई, श्री संदीप सावंत – बाल शिवाजी विद्यालय कणकवली पदाधिकारी, याशिवाय शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष श्री. शिवाजी गुरव, माजी वरिष्ठ लिपिक श्री. चंद्रसेन गोसावी, रणजीत सुतार, हेमंतकुमार परब, नारायण दळवी, सौ. श्वेता दळवी, सौ. सुकन्या कदम, सौ नीता गुरव आदी ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.
Follow us onया कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष श्री सूर्यकांत दळवी सर यांनी श्री. सत्यवान रेडकर व श्री. दयानंद सावंत यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच इतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते, श्री सत्यवान रेडकर यांचं हे १३४ वे निशुल्क व्याख्यान होतं. ONE MAN SHOW पद्धतीने विविध ज्वलंत उदाहरणे देत विनोदी खुमासदार, वक्तृत्व शैलीने त्यांनी मुलांना दोन तास खिळवून ठेवले. स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू, सहभागी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान मिळवण्याच्या विविध पद्धती त्याचप्रमाणे या क्षेत्रात असलेल्या विविध नोकरी व्यवसायाच्या संधी याबाबत विस्तृत माहिती दिली. १५० पेक्षा जास्त विद्यार्थांनी त्यांना विद्यार्थ्यांची मन की बात या सदराखाली पत्र लिहिली. ते सोशल मीडियावर याबाबतीत सक्रिय आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे श्री के आर दळवी स्कूल कमिटी चेअरमन यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिले.
हेही वाचा : आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….
अध्यक्षीय भाषणात श्री. सूर्यकांत दळवी यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व त्यासाठी लागणारे परिश्रम आणि चिकाटीने केलेले प्रयत्न याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे यांनी या कार्यक्रमास शुभेछा दिल्या.
कळसूली दशक्रोतील विविध गावामध्ये बॅनर, व प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत सर्व स्तरातून संस्था पदाधिकार्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सी.जी चव्हाण यांनी मानले.
Vision Abroad