
या गाड्या याआधी टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + स्लीपर – ०८ + जनरल – ०४ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डब्याच्या संरचनेनुसार चालविण्यात येत होत्या त्या आता खालील सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + इकॉनॉमी थ्री टायर एसी – ०२ + स्लीपर – ०८ + जनरल – ०२ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डबे. ह्या गाड्यांच्या सर्व डबे LBH स्वरूपाचे असणार आहेत.
कोणत्या आहेत ह्या गाड्या?
1) 22653 / 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल वीकली एक्सप्रेस.
22653 ही गाडी दिनांक १७/१२/२०२२ तर 22654 हि गाडी दिनांक १९/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, रत्नागिरी आणि मडगाव.
2) 22633 / 22634 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल वीकली एक्सप्रेस
22633 ही गाडी दिनांक २१/१२/२०२२ तर 22634 हि गाडी दिनांक २३/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, चिपळूण,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेडणे आणि मडगाव.
3) 22659 / 22660 कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश- कोचुवेली वीकली एक्सप्रेस
22659 ही गाडी दिनांक २३/१२/२०२२ तर 22660 हि गाडी दिनांक २६/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, रत्नागिरी आणि मडगाव.
Facebook Comments Box
जर तुम्हाला सोडायच्या आहेत तर फक्त कोकणी लोकांना सोडा गुजरात वरून गोव्याला नको . त्यात कोकणी लोकांचा काय समावेश नाही . Extra गाड्या सोडा सर्व स्टेशन घेऊ देत. धन्यवाद.