ह्या कारणांसाठी होत आहे ही मागणी
- ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही लाभदायक ठरेल
- मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
- ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल.
मुंबई : नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले आहे. जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या एका शिष्टमंडळाकडून हे निवेदन दिले गेले आहे. मराठवाडा विभागातून थेट कोकणात येण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार असल्याने याकडे रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
गाडीचे सध्याचे वेळापत्रक
17613/17614 ही गाडी पनवेल ते हुजूर साहिब नांदेड स्थानकांदरम्यान चालविण्यात येत आहे. ही गाडी पनवेल स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड ह्या स्थानकावरून संध्याकाळी 6 वाजुन 20 मिनिटांनी सुटते ती पनवेल स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचते.
(Also Read >कोंकणरेल्वेच्या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल…ह्या गाड्यांचे जनरल डबे कमी केलेत… )
हि गाडी चिपळूणपर्यंत विस्तारित होण्याच्या शक्यता
सकाळी पनवेल स्थानकावर 9 वाजता ही गाडी पोहोचल्यावर संध्याकाळी 4 वाजता नांदेड साठी निघते ह्या दरम्यानच्या वेळेमध्ये ही गाडी पुढे काही स्थानकांपर्यंत चालवता येवू शकते. पनवेल ते चिपळूण मधील अंतर साधारणपणे 3.30 तासाचे आहे. कोकण मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन ह्या गाडीच्या वेळापत्रकात किंचित बदल करून तर ही गाडी पुढे चिपळूण पर्यंत विस्तारित करता येणे शक्य आहे.
(Also Read : कोकण रेल्वेमार्गावर धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी)
ह्या विस्ताराने हे लाभ मिळतील
ही गाडी मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तसेच ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही प्रवास करायला सोपा पर्याय उपलब्ध होईल. ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल आणि आपल्याला एक गाडी मिळेल जेणेकरून इतर गाड्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही मदत होईल.
Vision Abroad