सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us onसहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.
Vision Abroad