Konkan Railway News : ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. कोंकण रेल्वेने ह्या सणासाठी या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या विशेष शुल्कासह ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 09057 / 09058 Udhana – Mangaluru Jn. – Udhana (Bi-Weekly) Special on Special Fare
ह्या गाड्या उधना ते मंगुळुरु ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 09057
ही गाडी दिनांक 21/12/2022 ते 01/01/2023 पर्यंत प्रत्येक बुधवार आणि रविवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी उधना ह्या स्थानकावरुन रात्री 20.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 18.30 वाजता मंगुळुरु स्थानकावर पोहोचेल.
Train No 09058
ही गाडी दिनांक 22/12/2022 ते 02/01/2023 पर्यंत गुरुवार आणि सोमवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी मंगुळुरु स्थानकावरून रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 19.25 वाजता उधना स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड ,पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + (थ्री टायर एसी + टू टायर एसी – 02) + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 24 डबे
(Also Read : कोंकणरेल्वेच्या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल…ह्या गाड्यांचे जनरल डबे कमी केलेत… )
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn – Karmali – Ahmedabad Jn (Weekly) Special on Special fare.
ह्या गाड्या अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 09412
ही गाडी दिनांक 20/12/2022 आणि 27/12/2022 मंगळवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी अहमदाबाद स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05.00 वाजता करमाळी जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411
ही गाडी दिनांक 21/12/2022 आणि 28/12/2022 बुधवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद ह्या स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे थांबे
नंदियाद, आनंद, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड ,पनवेल,रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे ,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06+ टू टायर एसी – 02 +असे मिळून एकूण LHB 22 डबे
(Also Read: पनवेल नांदेड एक्सप्रेस चिपळूणपर्यंत विस्तारित करण्याची मागणी.)
(Also Read : नाताळासाठी गोवा आणि कोकणात जाणार्या पर्यटकांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या..)
Vision Abroad