सिंधुदुर्ग, दि. 21/12/2022 : आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालत्या लक्झरी बसला आग लागली. सुदैवाने ह्या अपघातात जिवितहानी झाली नाही पण बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .
Follow us on



या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.
Facebook Comments Box