सावंतवाडी: सावंतवाडी शहरात कचरा गोळा करण्यासाठी आता ई-रिक्षा दिसणार आहेत. ह्या आधी घंटा गाडीतून कचरा गोळा केला जात होता त्याची जागा आता ह्या ई-रिक्षा घेणार आहेत. आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या साडे अठरा लाखाच्या निधीतून हया गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. ई-रिक्षांमुळे पालिकेचा मोठा इंधनखर्च वाचणार असून मनुष्यबळ देखील कमी लागेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Follow us on(हेही वाचा >कोकणरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर-मडगाव विशेष गाडीची मुदत वाढवली)
दोन दिवसांपूर्वी या गाड्या सावंतवाडीत दाखल झाल्या आहेत. घंटागाडी मधून कचरा गोळा करण्यासाठी होणारा विलंब लक्षात घेता विजेवर धावणाऱ्या कचरा गाड्यांमुळे कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने होईल, त्यामुळे नागरिकांना कचरा जास्त वेळ साठून राहिल्याने करावा लागणारा दुर्गंधीचा सामना सुद्धा कमी होणार आहे. ह्या गाड्यांनी प्रदूषणाचा प्रश्न पण येत नाही. अगदी गल्ली बोळात पण ही रिक्षा नेता येईल अशी तिची रचना आहे त्यामुळे कचरा गोळा करण्यास या एक अधिक लवचिक आणि कार्यक्षम पर्याय आहे. ह्या आधी बहुतेक पालिकांनी आपल्या ताफ्यात अशा गाड्या सामील केल्या आहेत. त्यात आता सावंतवाडी नगरपालिकेचा समावेश झाला आहे. हा गाड्यांचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असून जलद गतीने या गाड्या नागरिकांच्या सेवेत येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Vision Abroad