Konkan Railway News : नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात आणि कोकणात गेलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून सहा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या सहा फेऱ्या पुढीलप्रमाणे असतील.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 05/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 07/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी 14:15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21:50 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 09 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 02 असे मिळून एकूण 19 डबे
(हेही वाचा>कोकणातील भाविकांना खुशखबर…शेगावला जाण्यासाठी रेल्वेचा नवा पर्याय…)
Train no. 01463 / 01464 – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 12/01/2023 आणि 19/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01464 कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 14/01/2023 आणि 21/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई स्थानकावर पोहोचेल.
ह्या गाड्यांचे कोकणातील थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगांव.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
Vision Abroad