रत्नागिरी: रत्नागिरीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन जानेवारीअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटींचा निधीही शासनाकडून मिळाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. जमिनिचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
(Also Read>मोपा विमानतळावरून पहिले विमान उडाले…मुंबई ते गोवा प्रवासभाडे रेल्वेच्या एसी फर्स्टक्लास (1A) पेक्षाही कमी)
विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
(Also Read>सिंधुदुर्गात भव्य दिव्य अशा १७ फूट उंचीच्या मारुती मूर्तीची स्थापना.. पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल अशी आशा..)
Facebook Comments Box
Vision Abroad