Mumbai Local News:एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी प्रवासी चक्क बनावट Fake पास वापरत असल्याचे प्रकार उघडकीस यायला लागले आहेत. चर्चगेट ते विरार ह्या मार्गावर दोन दिवसांपूर्वी तिकीट तपासणीसांच्या एका गस्त पथकाने अशाच एका बनावट पास धारकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीवर फसवणूकी संबधित कलमे लावून अटक केली आहे.
चौकशीत त्याने तो पास विरारला एका मोबाईल रीचार्ज शॉप मधून 600 रुपयांना विकत घेतला होता असे कबूल केले आहे. विरार ते चर्चगेट एसी प्रवासभाडे वर वर पाहता हा पास खरा वाटत असला तरी काही बारकाईने निरीक्षण केल्यास फरक लक्षात येतो. तिकीट तपासणीसाने जेव्हा ह्या बनावट पासधारकास पास दाखविण्यास सांगितले तेव्हा एका प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेला तो पास दाखवला. थोडीसी शंका आल्याने तपासणीसाने तो प्लास्टिक कव्हर मधून बाहेर काढला आणि साधारण एका मिनिटच्या बारीक निरीक्षणाने तो पास बनावट असल्याचे त्याचा लक्षात आले.
विरार ते चर्चगेट एसी लोकल चे प्रवासभाडे महिना 2005 एवढे आहे तर हा बनावट पास 600 रुपयामंध्ये बनवून भेटत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad