रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू केलेली ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप: प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.
(Also Read > एसटीच्या ‘अच्छे दिन’ साठी ‘हि’ त्रिसूत्री आवश्यक)
तिकीट दर
ह्या फेरीचा दर अगदी माफक ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण प्रवासासाठी पौढांसाठी तिकीटदर ३०० रुपये तर लहान मुलांसाठी १५० दर आकारण्यात येणार आहे.
संपर्क
अधिक माहितीसाठी रत्नागिरी स्थानक आगारास भेट द्यावी किंवा आगारव्यवस्थापक 7588193774 / स्थानकप्रमुख 9850898327 ह्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा
Facebook Comments Box
Vision Abroad