कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून गेल्या सहा महिन्यांत कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी अशा प्रवाशांकडून सुमारे ५ कोटी १६ लाख रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत गेल्या सहा महिन्यात एकूण ८२,५१२ अशा प्रवाशांवर कारवाई करून कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी ५,१६,३३,१९७ रुपये दंडापोटी वसूल केले आहेत.
ऑनलाईन काढलेले तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होते. अशा वेळी काही प्रवासी विनातिकिट डब्यात चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन बिनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे.
दरम्यान गैरसोय आणि कारवाई टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Facebook Comments Box