Mopa Airport News : नवे अकासा एअर देशाच्या नेटवर्कमधील १२ वे ठिकाण म्हणून आज बुधवारपासून गोव्यातून मोपा (Manohar International Airport) विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू करतकेली आहे आहे. दरम्यान, अकासा एअरचे बंगळुरू ते गोवा QP1392 विमान गोव्यातील मोपा विमानतळावर 11 वाजता उतरले. अकासा विमान कंपनीने विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पदभरती सुरु केली होती.
आजपासून अकासा एअरने गोव्यातून मोपा विमानतळावरून आपली विमानसेवा सुरू केली आहे. मुंबई-गोवा-बंगळुरू अशी ही दुहेरी सेवा असेल, अशी माहिती अकासा एअरचे सह-संस्थापक व मुख्य व्यवसाय अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिली.
अय्यर म्हणाले, अकासा एअरने अलीकडेच हैदराबाद-बेंगळुरू आणि हैदराबाद-गोवा मार्गांवर २५ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दैनंदिन उड्डाण ऑफर करत असलेल्या नेटवर्कवरील १३ वे डेस्टीनेशन म्हणून हैदराबादची घोषणा केली आहे.
Vision Abroad