आधीच मुंबई गोवा महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत असताना त्यात कंत्राटदार कंपनीच्या चुकीमुळे होणार्या अपघातांची भर पडताना दिसत आहे.
Mumbai Goa Highway News :आज मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने डोंगर कापत असताना निसटलेला एक भला मोठा दगड चक्क रस्त्यावर आला. सुदैवाने त्यावेळी कोणतेच वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. ह्या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी ह्या प्रकारामुळे धास्तावले आहेत.
(हेही वाचा >सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११० मोबाईल टॉवर मंजूर…’या’ गावांमध्ये उभारले जाणार)
मागेच अशा दुर्लक्षामुळे येथे असे दोन प्रकार घडले आहेत. एक असाच मोठा दगड निसटून पायथ्याशी वसलेल्या बौद्धवाडीतील एका घराची भिंत फोडून घुसला. सुदैवाने घरी कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये घर मालकांस नुकसान भरपाई कंत्राटदार कंपनीकडून दिली गेली. त्यानंतर घाटात संरक्षक भिंती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भिंती उभारलेल्या असतानाच गेल्या शनिवारी डोंगर कापत असतानाच निसटलेला दगड एका घराजवळ येवून पडला. यात तेथील साहित्याची मोडतोड होवून नुकसान झाले असले तरी मोठी दुर्घटना मात्र टळली.
(Also Read>सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दुसरी रिक्षाचालक होण्याचा मान वेंगुर्ल्याच्या हेमलता हिला..)
ह्या सर्व प्रकारांवरून ह्या कामादरम्यान होणारी सुरक्षेच्या उपयोजनांकडे होणारे दुर्लक्ष समोर आले आहे. कंपनी सुरक्षेकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे.
Vision Abroad