सिंधुदुर्ग। प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात अचानकपणे पुन्हा पाणमांजरे दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री ही पाणमांजरे निदर्शनास आली. चार ते पाच पाणमांजरे काही नागरीकांना दिसून आली आहेत. मोती तलावाच्या कठड्याच्या बांधकामांमुळे तलावाचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामूळे माशांच्या शोधात ही मांजरे कमी पाण्यात फिरत असावीत असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
सावंतवाडीतील तलावात पाणमांजरे असावीत कि नसावीत ह्यावर दोन विरुद्ध मतप्रवाह येथील नागरिकांमध्ये आहेत. पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्या साठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडी च्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे
(Also Read > कोकण रेल्वे मार्गे आणखी चार एक्सप्रेस विजेवर धावणार!.)
Facebook Comments Box
Vision Abroad