सावंतवाडी । प्रतिनिधी : तळकोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,महाराष्ट्र व गोवा राज्यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी येथील ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार २ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होणारे कार्य्रक्रम
सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.
(Also Read > कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)
Facebook Comments Box
Vision Abroad