कोल्हापूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बास्केट ब्रिज भूमिपूजनाच्या कार्यक्रमात होणाऱ्या ब्रिजच्या रस्त्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.कितीही मोठा पूर आला तरी पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक थांबणार नाही. सांगली-कोल्हापुरात सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधू.पुढचे ५० वर्षे या रस्त्यावर खड्डा पडणार नाही, याची हमी देतो, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे.गेली अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यात महापरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर येत असल्यामुळे अनेक दिवस या परिसरातील वाहतूकही ठप्प होत असते. यासाठी सातारा ते निपाणी या दरम्यान सहा पदरी महामार्ग तयार करण्यात येणार आहे.
कोल्हापुरातील पंचगंगा नदी पुलावरून थेट कोल्हापूरपर्यंत बास्केट ब्रिजची निर्मिती करण्यात येणार आहे. याची पायाभरणी तसेच रत्नागिरी कोल्हापूर राज्य मार्ग चौपदरीकरण टप्पा 2 , रत्नागिरी कोल्हापूर चौपदरीकरण टप्पा 3 याचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झालं आहे.
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी पुढे म्हणाले, ‘पुण्यासाठी लवकरत रिंग रोड बांधणार आहे. नागपूर ते कोल्हापूर सात तासात अंतर पार होईल अशी व्यवस्था करत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन उद्योग झाले पाहिजेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना ऊर्जा दाता बनवलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यानेच पुढाकार घेतला पाहिजे’. असे गडकरी म्हणाले
Vision Abroad