मुंबई :मागील सुनावणी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण होणार असे राज्य सरकारद्वारे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. पण आताच झालेल्या सुनावणीत ही तारीख पुढे ढकलली आहे. ह्या महामार्गावरील अखेरचा टप्पा १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे.
मुंबई-गोवा महार्गावरील अरवली – कंटे – वाकड ह्या पट्ट्यातील साडेनऊ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली आहे.
महामार्गाच्या कामाची सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
अ. क्र. टप्पा अंतर पूर्ण झालेले काम
1 पनवेल (पळस्पे) ते इंदापूर शुन्य ते ८४ कि.मी. ८६.००%
2 इंदापूर ते वडपाळे ८४ ते १०८ किमी ६६.००%
3 वडपाळे ते भोगाव खुर्द १०८ ते १४७ किमी ९३.००%
4 भोगाव खुर्द ते कशेडी १४७ ते १६१ किमी ८३.८६%
5 कशेडी ते परशुराम घाट १६१ ते २०४ किमी ९७.५०%
6 परशुराम घाट ते आरवली २०४ ते २४१ किमी ७४.०२%
7 आरवली ते कांटे २४१ ते २८१ किमी २७.०८%
8 कांटे ते वाकड २८१ ते ३३२ किमी २९.२५%
9 वाकड ते तळगाव ३३२ ते ३६७ किमी १००.००%
10 तळगाव ते कळमठ (३६७ ते ४०६ किमी १००.००%
11 कळमठ ते झाराप ४०६ ते ४५० किमी १००.००%
एकुण ११ टप्पे ८८.५०%
Vision Abroad