मुंबई : या आठवडय़ात सुरू होणार्या मुंबई ते शिर्डी 22223/Mumbai CSMT – Sainagar Shirdi Vande Bharat Express या वंदे भारत गाडीमुळे भाविकांना शिर्डीला जाण्याचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.
एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य
मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस आनंदाची पर्वणी राहणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी 12:10 वाजता ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.तसेच शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सायंकाळच्या वेळेला धावणार आहे. सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी (5:25 PM) ही ट्रेन शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी (11:18 PM)ही ट्रेन मुंबई या ठिकाणी पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस ही ट्रेन धावणार आहे.
मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1660 रुपये असे दर तर नाशिक ते मुंबईसाठी अनुक्रमे 550 आणि 1250 रुपये तिकीट दर आहेत.
थांबे
ही गाडी फक्त काही मोजक्या स्थानकावर थांबणार आहे. दादर, ठाणे, नाशिक हे या गाडीचे थांबे आहेत.
खाद्यपदार्थांचे पर्याय
सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत
जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल.
सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत. यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
Vision Abroad